कोकणात शिवसेनेला धक्का : अनिकेत तटकरे विजयी
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांचे निकाल घोषित करण्यात आले असून, कोकणातुन राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे विजयी झाले आहेत तर नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादीला साथ देवूनही या ठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे (४१२ मते) विजयी झाले आहेत.
आज घोषित झालेले निकाल पुढील प्रमाणे
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना – नरेंद्र दराडे (४१२ मते)
राष्ट्रवादी – शिवाजी सहाणे (२१९ मते)
शिवसेना १९३ मतांनी विजयी
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था
राष्ट्रवादी – अनिकेत तटकरे (४२१ मते)
शिवसेना – राजीव साबळे (२२१ मते)
राष्ट्रवादी २०० मतांनी विजयी
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना – विप्लव बाजोरिया (२५६ मते)
काँग्रेस – सुरेश देशमुख (२२१ मते)
शिवसेना ३५ मतांनी विजयी
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा – प्रविण पोटे-पाटील (४५८ मते)
काँग्रेस – अनिल मधोगरिया (१७ मते)
भाजप ४४१ मतांनी विजयी
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा – रामदास आंबटकर (५५० मते)
काँग्रेस – इंद्रकुमार सराफ (४६२ मते)
भाजप ८८ मतांनी विजयी










