पंकजा मुंडेंनी घेतली भुजबळांची भेट
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज लिलावती रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे उपस्थित होत्या.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ लिलावती रूग्णालयात उपचार घेत आहे. भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी काही दिवस सांताक्रुझ येथिल निवासस्थानी आराम घेतला या वेळी विविध राजकिय पक्षांच्या नेत्यांनी भुजबळांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आज राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी लिलावती रूग्णालयात भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.










