शिवसेनेने “त्या” क्लिपचा मोडून तोडून वापर केला:मुख्यमंत्री

शिवसेनेने “त्या” क्लिपचा मोडून तोडून वापर केला:मुख्यमंत्री

वसई :  शिवसेनेने सादर केलेली ओडिओ क्लिप माझीच आहे परंतु १४ मिनिटांची असलेली ही क्लिप शिवसेनेने मोडून तोडून सादर केली आहे. शिवसेनेला आपला पराभव दिसत असल्यानेच ते खालच्या पातळीवर उतरली असल्याची टीका करतानाच मी स्वत: ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार असून,जर त्या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळले तर माझ्यावर कारवाई करा, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख यांनी सादर केलेली ओडिओ कालची क्लिप मुख्यमंत्र्यांनी आज आहे अशी संपूर्ण  ऐकवली. शिवसेनेला पराभव दिसत असल्यानेच त्यांनी ती  मोडून तोडून सादर केली. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले ते आज वसई मध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टिका केली. शिवसेनेने सादर केलेली क्लिप संपूर्ण ऐका असे ते म्हणाले.

आम्ही सत्ते असलो तरी, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार केला नाही आणि करणार नाही असे या क्लिपमधील शेवटचे वाक्य होते. मात्र ते त्यांनी सादर केले नाही. ते ऐकवले असते तर ते तोंडावर पडले असते असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा !
Next articleशिवसेना भाजपची युती न झाल्यास काॅग्रेसला संधी: महसूलमंत्री