शिवसेना भाजपची युती न झाल्यास काॅग्रेसला संधी: महसूलमंत्री
कोल्हापूर : सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेशी आमच्यासोबत असणारी युती अजून तुटलेली नाही आणि तुटणारही नाही. परंतु आगामी लोकसभा आ आणि विधानसभा निवडणुकीत आमच्या दोन्ही पक्षांची युती न झाल्यास काँग्रेस विजयी होईल असे भाकित राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.
देश आणि राज्याच्या हितासाठी भाजपने शिवसेनेसोबत युती करायण्याचा प्रस्ताव ठेवला असून,केवळ पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत सेना आणि भाजप स्वबळावर लढत असल्याने आमची युती तुटणार नाही असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजप सत्तेवर आल्यापासुन राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढलो असलो तरी सरकारमध्ये एकत्रित आहोत. भाजप युतीसाठी सकारात्मक आहे परंतु शिवसेना राजी नसेल तर आमची त्याला हरकत नाही असेही महसूलमंत्री म्हणाले.










