गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळी मतदान यंत्रात झालेल्या बिघाडामुळे आणि काही मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची वेळ आल्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारीपदासह जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सोमवारी भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी अभिमन्यू काळे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात होते.