राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई: राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे के. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झाले.काल रात्री एकच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

राज्याचे कृषिमंत्री फुंडकर यांची प्रकृती ठिक नसल्याने काल त्यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रात्री एकच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे पार्थिव खामगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे. कृषिमंत्री फुंडकर यांना काही दिवसापूर्वी जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने के जे सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री आठ वाजता पुन्हा श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला आणि एकच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला.

Previous articleसंभाजी भिडे यांच्या विधानांविरूद्ध सरकार कारवाई करणार का?
Next articleमहाराष्ट्र एका अभ्यासू नेतृत्वाला मुकला : बापट