पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावीत २९ हजार ५७२ मतांनी विजयी
मुंबई : पालघर लोकसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाने गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेने मोठे आव्हान उभे केले होते. श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश करताच काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांनी पालघरच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला .भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना २ लाख ७२ हाजार ७८२ तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली. दुसरीकडे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकरराव कुकडे ४८ हजार मतांनी विजयी झाले. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ मते मिळाली.
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी आज करण्यात आली. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. तर कॅांग्रेसचे नेते राजेंद्र गावीत यांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढविल्याने या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.पालघरची निवडणूक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. आज मतमोजणीला सुरूवात झाल्यापासुन भाजपचे उमेदवार गावीत यांनी पहिल्या फेरीपासुनच आघाडी घेतली होती. अंतिम फेरीची मतमोजणी झाल्यानंतर भाजपचे राजेंद्र गावीत यांना २ लाख ७२ हजार ७८२, शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना २ लाख ४३ हजार २१० मते मते भाजपचे उमेदवार गावीत यांनी शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे बळिराम जाधव यांना २ लाख २२ हाजार ८३८, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे उमेदवार किरण गहाला यांना ७१ हजार ८८७, तर कॅांग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना केवळ ४७ हजार ७१४ मते मिळाली.
भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकी आणि भाजपाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार मधुरराव कुकडे विजयी झाले त्यांनी भाजपचे हेमंत पटले यांचा ४८ हजार ९७ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे मधुकरराव कुकडे यांना ४ लाख ४२ हजार २१३ तर भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ मते मिळाली. या ठिकाणी कॅांग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.