शहांची बकेट लिस्ट : कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष

शहांची बकेट लिस्ट : कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष

राज ठाकरेंचा शहांवर निशाणा

मुंबई: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष अमित शहा आज मुंबईच्या दौ-यावर असून, त्यांच्या संपर्क फॉर समर्थन या मोहिमेचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

संपर्क फॉर समर्थनच्या मोहिमे अंतर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशभरातील प्रसिध्द व्यक्तींच्या भेटीगाठी घेत असून,  देशातील अशा सुमारे १ लाख व्यक्तींच्या भेटी घेण्याचा त्यांचा संकल्प आहे. शहा हे आज मुंबईच्या भेटीवर असून, त्यांनी आज अभिनेत्री माधुरी दिक्षीत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, माधुरी दिक्षीत यांचा नुकताच बकेट लिस्ट हा मराठी चित्रपट आला आहे. याचाच धागा पकडत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. आज रेखाटलेल्या  व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी ज्या प्रसिध्द व्यक्तींना भेटायचे आहे, त्यांची एक  यादी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या हातात दाखवली आहे आणि त्यावर बकेट लिस्ट? अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे. अमित शहा बकेट ही यादी पाहण्यात व्यस्त असल्याचे दाखवून, सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले आहे, असे त्यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातुन फटकारले आहे.

Previous articleसहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
Next articleकधी टोपी न घालणारे इफ्तारची दावत देत आहेत- शरद पवार