उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात दोन तास बंद दाराआड चर्चा

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात दोन तास बंद दाराआड चर्चा

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्यातील मातोश्रीवरील बैठक संपली आहे.तब्बल दोन तास या दोन नेत्यांमध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेतील तपशील मात्र समजू शकला नाही.

भाजपचे राष्ट्रीय अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पावणे आठच्या सुमारास मातोश्रीवर पोहचले.त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शहा यांचे स्वागत केल्यानंतर मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे दोन तास बंद दाराआड चर्चा झाली.मात्र या दोन नेत्यांमध्ये कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मातोश्रीवरील बैठक संपल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शहा यांना दरवाज्यापर्यंत सोडायला आले होते. अमित शहा आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार सह्याद्री अतिथीगृहावर जाण्यासाठी रवाना झाले. बैठकीनंतर या दोन नेत्यामधिल देहबोली सकारात्मक होती.त्यामुळे शहा ठाकरे भेट यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

 

Previous articleकधी टोपी न घालणारे इफ्तारची दावत देत आहेत- शरद पवार
Next articleमुंबई पदविधर मतदार संघातून भाजपातर्फे अॅड. अमित महेता यांना उमेदवारी