खा. नारायण राणेंनी घेतली भुजबळांची भेट

खा. नारायण राणेंनी घेतली भुजबळांची भेट

मुंबई :  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यापासुन अनेक बड्या राजकीय नेत्यांनी त्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असतानाच आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी बांद्रा येथिल एमईटी येथे जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे आज नारायण राणे यांच्या पक्षाचा रंगशारदा येथे कार्यकर्ता मेळावा आहे.

Previous articleमुंबई पदविधर मतदार संघातून भाजपातर्फे अॅड. अमित महेता यांना उमेदवारी
Next articleशिवसेनेचे उमेदवार शिवाजी शेंडगेंचा उमेदवारी अर्ज दाखल