शिवसेनेचे उमेदवार शिवाजी शेंडगेंचा उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेचे उमेदवार शिवाजी शेंडगेंचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातुन शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी आज कोकण भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेनेने विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूका स्वबळावर लढविणार असून,मुंबई शिक्षक मतदारसंघातुन शिवसेनेचे उमेदवार प्रा. शिवाजी शेंडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करते प्रसंगी शिवसेना नेते खा. गजानन किर्तीकर, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई,आ. अनिल परब, आ. प्रताप सरनाईक, आ. प्रकाश सुर्व, अमोल किर्तीकर आदी उपस्थित होते.

Previous articleखा. नारायण राणेंनी घेतली भुजबळांची भेट
Next articleशिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता : विखे पाटील