पूर्ण पिक्चर अजून बाकीच आहे : उद्धव ठाकरे

पूर्ण पिक्चर अजून बाकीच आहे : उद्धव ठाकरे

पालघर :  पालघरच्या पोटनिवडणूकीत  शिवसेनेने साम-दाम-दंड-भेदवाल्यांना  घाम फोडला. निवडणूकीच्या काळात पैसे वाटणा-यांवर अजून कारवाई करण्यात आली नाही असे सांगतानाच, आता नाटकं सुरू आहेत, पिक्चर अजून बाकी आहे, असे स्पष्ट करून शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेना भाजपाशी युती करणार नसल्याचे संकेत दिले. २०१९ ला श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे असे सांगून , पालघर लोकसभा मतदारसंघातुन श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज पालघरमधल्या शिवसेनेच्या सभेत बोलत आहेत. कालच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेवून सुमारे दोन तास चर्चा केल्यानंतर या दोन्ही पक्षात असलेली कटूता संपुष्टात येईल अशी चर्चा सुरू असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी  भाजपावर जोरदार हल्ला चढवविला. पालघर मधिल पोटनिवडणूकीत साम-दाम-दंड-भेदवाल्यांना शिवसेनेने घाम फोडला. निवडणूक काळात पैसे वाटणा-यांवर अजून कारवाई जाली नाही असे सांगत आता नाटकं सुरू आहेत, पिक्चर अजून बाकी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करून आगामी निवडणुकीत युती करणार नसल्याचे संकेत दिले.पालघर पोटनिवडणूकीत आमचा झालेला पराभव आम्ही खिलाडू वृत्तीने नव्हे, तर कोणत्याच परीने मान्य करायला तयार नाही.कारण या निवडणूकीत भाजपाच्या विरोधात तब्बल सहा लाखांच्या आसपास मते पडली असल्याचे ते म्हणाले.

Previous articleमातोश्रीवर शहा-उध्दव भेटीत शिवसेनेची किंमत किती ठरली
Next articleपरळीचा आमदार मीच होणार- धनंजय मुंडे