नितीन गडकरींनी घेतली सलमान खानची भेट

नितीन गडकरींनी घेतली सलमान खानची भेट

मुंबई :  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौ-यानंतर केंद्रिय भूपृष्ठ परिवहन महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत आज प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. गडकरी हे आज रात्री अभिनेता नाना पाटेकर यांचीही भेट घेणार आहेत.

केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अमित शहा यांनी मुंबई भेटीत जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि उद्योजक रतन टाटा यांची भेट घेतली होती. केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनीही आज जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथिल बॅण्ड स्टॅण्ड येथिल गॅलेक्सी निवासस्थानी जावून सलमान खान आणि समिल खान यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरी हे येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांची भेट घेणार असून, रात्री उशीरा प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या लोखंडवाला अंधेरी येथिल निवासस्थानी जावून भेट घेणार आहेत.

Previous articleपांडूरंग फुंडकर यांच्या निधनाने भाजपाचे मोठे नुकसान –  पंकजा मुंडे
Next articleउद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का : धनंजय मुंडे