उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का : धनंजय मुंडे

उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का : धनंजय मुंडे

मुंबई :   अंगणवाडी  कर्मचा-यांच्या संपाच्या वेळी सरकार मध्ये असूनही अंगणवाडी कर्मचा-यांना साथ देणारे शिवसेना कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे आता राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का , असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला असून एस.टी. कर्मचा-यांच्या संपावर तातडीने तोडगा काढण्याची तसेच अन्यायकारक दरवाढ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात सुरू असलेला एस.टी. कर्मचारी यांचा संप व महामंडळाने नुकतीच केलेली १८ टक्के दरवाढ याबाबत धनंजय मुंडे यांनी  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पेट्रोल, डिझेल, गॅस च्या पाठोपाठ एसटीच्या तिकीट दरवाढी मुळे आधीच त्रस्त सामान्य जनतेचे राज्यात सुरू असलेल्या एस.टी. कर्मचा-यांच्या संपामुळे हाल होत आहेत. एकीकडे कर्मचा-यांना पगारवाढ दिल्याचे कारण दाखऊन तिकिटांची दरवाढ करायची , दुसरी कडे कर्मचारी यांना ही समाधानकारक पगारवाढ न देऊन त्यांचीही फसवणूक करायची असा सरकारचा दुहेरी फसवणुकीचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात सुरू असलेल्या एस. टी. कर्मचा-यांच्या संपाबाबत, व कर्मचा-यांच्या न्याय मागण्यांबाबत सरकारने तातडीने तोडगा काढला पाहिजे. तसेच अन्यायकारक दरवाढ मागे घेऊन जनतेला आणि कर्मचारी यांना दिलासा दिला पाहिजे  अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

Previous articleनितीन गडकरींनी घेतली सलमान खानची भेट
Next articleअमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राज ठाकरेंचा निशाणा