अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राज ठाकरेंचा निशाणा

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राज ठाकरेंचा निशाणा

मुंबई: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची  मातोश्रीवर जाऊन भेट घेतली सुमारे दोन तास झालेल्या सकारात्मक भेटी नंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोन नेत्यांच्या भेटीवर व्यंगचित्राच्या माध्यामातुन निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या स्वबळाच्या ना-यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख यांची भेट घेवून सुमारे दोन तास चर्चा केली. या भेटीनंतर या दोन पक्षांत असणारी कटूता संपुष्टात येईल असे वातावरण होते. मात्र या भेटीत काय घडले यांचे व्यंगचित्र रेखाटून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भेटीचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी आज आपल्या फेसबुकवर व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे त्यामध्ये अमित शहा आणि उद्धव टाकरे हे गळा भेट घेत असल्याचे दाखवले आहे. तर त्याच वेळी या दोन्ही नेत्यांच्या हातात खंजीर रेखाटून ते एकमेकांच्या पाठित खुपसत असल्याचे दाखवले आहे. शिवसेना नेहमीच सत्तेतून बाहेर पडू, सरकारचा पाठिंबा काढू असा इशारा सरकारला देत असल्याने या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या खिशात राजीमाने असल्याचे दाखवून त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

 

Previous articleउद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का : धनंजय मुंडे
Next articleनितीन गडकरी नाना पाटेकरांच्या भेटीला