नितीन गडकरी नाना पाटेकरांच्या भेटीला

नितीन गडकरी नाना पाटेकरांच्या भेटीला

मुंबई :  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौ-यानंतर केंद्रिय भूपृष्ठ परिवहन महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत आज प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची भेट घेतली.

केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अमित शहा यांनी मुंबई भेटीत जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि उद्योजक रतन टाटा यांची भेट घेतली होती. केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनीही आज जनसंपर्क समर्थन अभियान अंतर्गत प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथिल बॅण्ड स्टॅण्ड येथिल गॅलेक्सी निवासस्थानी जावून सलमान खान आणि समिल खान यांची भेट घेतली. गडकरी यांनी येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांची भेट घेतली असून, त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या लोखंडवाला अंधेरी पश्चिम येथिल निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली.

Previous articleअमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राज ठाकरेंचा निशाणा
Next articleगतवैभव मिळविण्यासाठी कोकण पदवीधर निवडणूक महत्वाची : मुख्यमंत्री