अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई: गेल्या तीन दिवसापासून आपल्या विविध मागण्यासांठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतला आहे.कामगार संघटना आणि राज्याचे  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने आज  एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.

पगारवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून संपावर होते. अचानक पूकारलेल्या या संपामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला होता. गेल्याच आठवड्यात महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ जाहीर केली होती.मात्र याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गैरसमज होते.त्यामुळे कर्मचा-यांनी अचानक संप पुकारला होता.आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि विविध कर्मचारी संघटनांमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे रात्री उशीरापर्यंत चर्चा झाली.

मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे  निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याथ झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी  सुरू केलेला संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहनमंत्री रावते  केले त्यांच्या आवाहनाला कामगार संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.

एसटी कर्मचार्यांनी संपादरम्यानच्या केलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यावरील कारवाई वगळता इतर प्रकारच्या कारवाईतून त्यांना मुक्त करण्यात येईल अशी घोषणा रावते यांनी केली.

Previous articleआगामी निवडणुकींसाठी महाआघाडी करण्याचे काँग्रेसचे सूतोवाच
Next articleधारावी पुनवर्सनासह इतर प्रकल्पांसाठी एमबीएम समूहाचे सहकार्य लाभणार