१२ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

१२ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  :  राज्य सरकारने आज राज्यातील तब्बल बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून,गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे तर गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून सुनिल पोरवाल यांची नियुक्ती केली आहे.

राज्य सरकारने आज १२ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, उद्योग विबागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांची गृह विभागाचे अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई यांची मंत्रालयात उद्योग, उर्जा, कामगार विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.वित्त विभागाच्या (  सुधारणा ) अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांची मंत्रालयात शालेय शि७ण आणि क्रिडा विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.शालेय शिक्षण विभागाचे प्रदान सचिव नंदकुमार यांची प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी म्हणून सामान्य प्रशासन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांची प्यावरण विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची वित्त विभागात ( सुधारणा ) प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी केली आहे.परिवहन आणि बंदरे विभागाच्या प्रधान सचिव पदावर असलेले मनोज सौनिक यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव नियुक्ती करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांची सौनिक यांची नियुक्ती परिवहन आणि बंदरे विबागात प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. ठाणे आदिवासी विभागाचे अपर आयुक्त मनोज सूर्यवंशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती केली आहे. तर  संजय मीना यांची आदिवासी विकास महामंडळाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleकृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खा. संजय पाटील
Next articleनजीब मुल्ला यांच्या विजयाने हॅट्रीक पुर्ण करु : तटकरे