नजीब मुल्ला यांच्या विजयाने हॅट्रीक पुर्ण करु : तटकरे

नजीब मुल्ला यांच्या विजयाने हॅट्रीक पुर्ण करु : तटकरे

समविचारी लोक एकत्र आल्यास नक्कीच परिवर्तन घडेल

खेड : देशातील वातावरण हे बदलत चालले असुन दुर-दुर पर्यंत विकास कुठे बघायला मिळत नाही, लोकांमध्ये या सरकार विरोधात तीव्र प्रकारची चिड निर्माण झाली असुन, समविचारी लोकांनी एकत्र आल्यास देशात परिवर्तन घडेल, या परिवर्तनाची सुरवात नजीब मुल्ला यांना कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी करुन विजयाची हॅट्रीक पुर्ण करु असा विश्वास राष्ट्रवादी काॅग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. सुनील तटकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर खेडचे आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी जि.प.सदस्य, पं.स.सभापती, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकत्याच पार पडलेल्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाने पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असुन, कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह संचारला आहे. मागील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावत आघाडीचा उमेदवार निवडुन आणत भाजपची मक्तेदारी मोडत काढली होती. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाला सोडुन गेलेल्यांना या निवडणुकीत धडा शिकवावा असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले आहे.

केंद्र व राज्य सरकारने या निवडणुकीतील मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार मिळवु देण्याचे आश्वासन दिले होते पण आजपावेतो केवळ आश्वासनांची खैरात मिळाली आज याच तरुणांना सोबत घेत उद्याचा महाराष्ट्र घडविण्याचे काम या निवडणुकीच्या माध्यमातुन आपण करायला पाहीजे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईला जनता त्रस्त झाली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने अल्पसंख्याक समाजातील नजीब मुल्ला या तरुण, तडफदार, अनुभवी उमेदवाराला या निवडणुकीत संधी दिली असुन त्यांनी सक्षम नगरसेवक ते महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपदाचे काम चोखरित्या बजावले आहे. त्यांना निवडुन आणण्यासाठी कार्यकर्त्यानी मतदारांपर्यंत पोहचुन पक्षाची धोरण सांगितली पाहीजे प्रत्येक कार्यकर्त्याने किमान १० मतदारांशी संपर्क केल्यास आपला विजय पक्का आहे असा विश्वासदेखील आ. सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous article१२ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Next articleभाजपचे सुरेश धस विजयी;धनंजय मुंडेंना धक्का