पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कोण आहेत उमेदवार!

पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कोण आहेत उमेदवार!

मुंबई : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होत असून, मुंबई पदवीधर मतदार संघात भाजपाचे अमित मेहता, शिवसेनेचे विलास पोतनीस यांच्यासह एकूण १२ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाचे निरंजन डावखरे,शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादीचे नजिब मुल्ला यांच्यासह एकूण १४ उमेदवारांमध्ये लढत होत आहे.मुंबई शिक्षक मतदार संघात शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, लोकभारतीचे कपिल पाटील,आणि भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख यांच्यासह एकूण १० उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या निवडणूकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली.७ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.८ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.११ जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. या निवडणुकीसाठी येत्या २५ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येवून, २८ जून रोजी मतमोजणी होईल.

या तीन मतदार संघातील उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे-

Previous articleमहाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार
Next articleसीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर राज्यात गुंतवणूक करणार