ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आ. सुरेश धस यांनी मानले आभार
राॅयलस्टोन निवासस्थानी कार्यकर्त्यांसह घेतली भेट ; मंत्री पंकजा मुंडे यांनी पेढा भरवून केले अभिनंदन
मुंबई : बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत दणदणीत विजय प्राप्त करणारे भाजपचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आभार मानले. पंकजा मुंडे यांनी देखील पेढा भरवून त्यांचे विशेष अभिनंदन केले.
नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी नुकत्याच झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे यांना चारीमुंड्या चित करत ७६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती परंतु पंकजा मुंडे यांच्या जादूच्या कांडीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि भाजपला मोठे यश मिळाले.
मंत्री पंकजा मुंडे यांनी आखलेल्या रणनितीमुळे हा विजय मिळाल्याबद्दल आमदार सुरेश धस व त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांनी आज संध्याकाळी राॅयलस्टोन निवासस्थानी जावून पंकजा मुंडे यांची भेट घेतली व त्यांचे आभार मानले. पंकजा मुंडे यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अभिनंदन केले. यावेळी डाॅ. अमित पालवे, भाजपचे नेते रमेश आडसकर, जि. प. चे समाजकल्याण सभापती संतोष हंगे, राणा डोईफोडे आदी यावेळी उपस्थित होते.










