ऑनलाईन बदल्यांमुळे शिक्षकांची झाली गैरसोय दूर ; शिक्षकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार

ऑनलाईन बदल्यांमुळे शिक्षकांची झाली गैरसोय दूर ; शिक्षकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार

औरंगाबाद :  वर्षानुवर्षे बदली प्रक्रियेच्या किचकट चक्रव्युहात अडकलेल्या शिक्षकांची राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या एका निर्णयामुळे सुटका झाली आहे, यामुळे राज्यातील हजारो शिक्षक व त्यांचे कुटूंबिय त्यांच्यावर जाम खूश असून आज विमानतळावर ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानताना या शिक्षकांच्या चेह-यावरचा ओसंडून वाहत होता.

यावर्षी ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याचा ‘न भूतो, न भविष्यति’ असा निर्णय घेवून एक आदर्श पायंडा पाडला. या अभुतपुर्व निर्णयामुळे वर्षानुवर्षे बदली साठी रखडत पडलेल्या शिक्षकांना अपेक्षे प्रमाणे तसेच हवी तिथे बदली मिळाल्या मुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त होत आहे. शिक्षकांची होणारी प्रचंड गैरसोय व हेळसांड तसेच यात होणारा घोडेबाजार या महत्वपूर्ण आणि जनहितकारी निर्णयामुळे थांबला. ना. पंकजाताई मुंडे राज्यात सध्या ज्या ज्या ठिकाणी दौ-यावर जात आहेत तिथे तिथे शिक्षक वृंद त्यांचे आभार माणून कृतज्ञता व्यक्त करत आहेत.असाच प्रकार आज ना.पंकजाताई मुंडे औरंगाबाद दौऱ्यावर असतांना पहावयास मिळाला.

पैठण तालुक्यातील नदीकाठवस्ती ता.पैठण जिल्हा औरंगाबाद येथील जिल्हा परिषद शिक्षक महेश लबडे यांनी अन्य शिक्षकांसमवेत पंकजाताई यांची विमानतळावर भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानले.
जिल्हा परिषद अंतर्गत बदल्यांच्या या प्रक्रियेत पूर्वी राजकीय वरदहस्त व घोडेबाजार होत असल्याने शिक्षक व त्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळत नव्हता पण आता ना.पंकजाताईंच्या निर्णयामुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता आली परिणामी शाळांमध्ये सकारात्मक व उत्साही वातावरण निर्माण झाले आहे व याचा फायदा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी होणार असल्याचे शिक्षकवृंदानी सांगितले.

पंकजाताई मुंडेंमुळे मिळाला न्याय -महेश लबडे

पैठण तालुक्यातील नदीकाठची वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक महेश लबडे यांना या निर्णयाचा झालेला आनंद स्पष्ट दिसत होता. बदली प्रक्रियेवर त्यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे शिक्षकांना खरा न्याय मिळाला आहे. काल आम्ही पती-पत्नी एकाच गाडीवर शाळेत जावू शकलो. मनासारखी बदली झाल्याने शाळेत जातांना रस्त्यावर थांबून पत्नीसोबत सेल्फी काढण्याचा मोह मला आवरला नाही. तो सेल्फी पंकजाताईना शेअर करून आम्ही त्यांचे आभार मानले. माझ्यासारखे हजारो शिक्षक आज आनंदी आहेत असे ते म्हणाले.

Previous articleनागरिकांना गतीने सेवा देण्यासाठी ‘ओरॅकल’ राज्य शासनासोबत काम करणार
Next articleभगवान के घर देर है अंधेर नहीं है- छगन भुजबळ