भगवान के घर देर है अंधेर नहीं है- छगन भुजबळ

भगवान के घर देर है अंधेर नहीं है- छगन भुजबळ

नांदगांव : गेले दोन अडीच वर्ष मला नाशिक जिल्हा व महाराष्ट्र भरातून लोक भेटण्यासाठी येत होते.यासर्व लोकांच नातं रक्ताच्या पालिकडचं असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते नस्तनपूर येथे स्वागत समारंभाप्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी खा. समीर भुजबळ, आ.पंकज भुजबळ, आ.जयवंतराव जाधव, माजी आ.अनिल आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक ऍड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, अश्विनी आहेर, नांदगांवचे माजी नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री,भास्कर कदम ज्येष्ठ नेते साहेबराव पाटिल, तालुका कार्याध्यक्ष रमेश पगार आदी उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आ.पंकज भुजबळ यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की, अडीच वर्षानंतर मुंबईच्या बाहेर पडलो, नाशिक जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटीची आस लागली होती.त्यामुळे तुमच्या भेटीसाठी आलो आहे.देवाच्या दर्शना सोबत जनता जनार्दनाची भेट घेणे हा त्यामागचा उद्देश आहे. आम्हाला गेली दोन वर्ष लोक भेटण्यासाठी येत होते त्यांच आणि आपलं नातं हे सर्व रक्ताच्या नात्याच्या पालिकडेच हे नातं आहे असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला अभिमान असेल अशी महाराष्ट्र सदनाची एक सुंदर इमारत उभारली गेली. मात्र शंभर कोटीच्या कामात साडे अठशे कोटिंचा अपहार झाला असा जावई शोध आरोप करणाऱ्यांनी लावला असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.माल्या , मोदी सारखे पळून न जाता चौकशीला सामोरे गेलो असेही त्यांनी खडसावून सांगितले.भगवान के घर देर है अंधेर नहीं है असेही ते म्हणाले.शेवटी जनतेचे आभार मानून नस्तनपुर देवस्थानच्या सुंदर वास्तुची निगा राखल्याबद्दल संस्थानच्या अध्यक्ष व संचालकाचे कौतुक त्यांनी केले.

यावेळी आ.अनिल आहेर म्हणाले की, दिन दुबळयासाठी काम करणारे लोकनेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर गेले दोन वर्ष सुडाचे राजकारण झाले. नस्तनपुर परिसराचा कायापलट करण्यात छगन भुजबळ यांचे महत्वाचे योगदान आहे. या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त पोरके आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन सर्वाना आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विकास कामे करण्यासाठी छगन भुजबळ हे प्रेरणास्थान आहे. येणार सरकार हे छगन भुजबळ यांचे असेल असा आशावाद व्यक्त करुण भुजबळ यांना दिर्घायुष्य लाभो अशी त्यांनी शनि महाराज यांच्याकडे प्रार्थना केली.

Previous articleऑनलाईन बदल्यांमुळे शिक्षकांची झाली गैरसोय दूर ; शिक्षकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार
Next articleबाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद