अॅड. अमित मेहता यांच्यासह भाजपाच्या उमेदवारांना रिपाइंचा पाठिंबा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा
मुंबई : येत्या २५ जुन रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांमध्ये होणा-या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज याची घोषणा केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते मधु चव्हाण व अतुल शाह उपस्थित होते.मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार ॲड. अमित महेता, कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अॅड. निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अनिल देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अनिकेत पाटील यांना रिपाई (ए) ने पाठिंबा जाहीर केला आहे. या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी काम करतील, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.