राज ठाकरेंनी उडवली पंतप्रधानांच्या फिटनेस चँलेंजची खिल्ली
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चँलेंजची खिल्ली उडविली आहे.तर दुसरीकडे राज्यात वाढत असलेली जातीपातीची विषवल्ली वेळीच छाटण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी या माध्यमातून केले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रसिध्द केलेल्या व्यंगचित्रातून दोन घटनांवर भाष्य केले आहे.आज प्रसिध्द केलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडावर फिटनेस चॅलेंज देताना दाखवले आहे तर शेजारी एक वयोवृध्द जोडपे रेखाटून एक व्यक्ती मोदींकडे बघून रडताना दाखवली आहे.तर ” ऊठा…असे रडत का बसला !…लहान पोरासारखे ! अहो..ते व्यायाम करतायत, असे रेखाटून पंतप्रधान मोदींच्या फिटनेस चँलेंजची खिल्ली उडविली आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी घालण्याचे आवाहन केल्यानंतर, यावर टीका करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात जामनेरमधील मारहाणीच्या घटनेमुळे सरकारवर चौफेर टीका करण्यात आली होती.याच घटनांचा आधार घेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे प्रतिक म्हणून एक झाड रेखाटले आहे. हे झाड जातीपातीच्या विषवल्लींनी वेढलेले दाखवून. एक मराठी माणूस मुख्यमंत्री फडणवीस यांना जातीपातीच्या विषवल्ली छाटण्याचे आवाहन करताना रेखाटले आहे.