एसटीचे १ हजार १० रोजंदारी कामगार सेवामुक्त

एसटीचे १ हजार १० रोजंदारी कामगार सेवामुक्त

मुंबई : ८ व ९ जून रोजी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपामध्ये सामील झालेल्या १ हजार १० रोजंदारी कामगारांना एसटीच्या स्थानिक प्रशासनाने सेवामुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.आता या जागी प्रतिक्षा यादीवरील इतर उमेदवारांना महामंडळात सेवेची संधी दिली जाणार आहे.

नुकतेच महिना-दोन महिन्यापुर्वी रूजु झालेल्या सुमारे ९ हजार रोजंदार कर्मचाऱ्यांचा २०१६-२०च्या कामगार वेतन करारशी कोणताही संबंध नाही, तरीही त्यांच्यापैकी १ हजार १० रोजंदार कर्मचारी ८ व ९ जुन रोजी अघोषित संपात सहभागी झाले,तसेच ते कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होवून,महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली, या कारणास्तव त्यांची एसटी महामंडळातील सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीवरील इतर उमेदवारांना महामंडळात सेवेची संधी दिली जाईल.असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Previous articleसंविधानावर शरसंधान करणा-यास उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही : शरद पवार
Next articleविजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे अभिनंदन