नवे मनोरा आमदार निवास होणार “गगनचुंबी”

नवे मनोरा आमदार निवास होणार “गगनचुंबी”

मुंबई :   मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवास पाडण्याच्या कामाला लवकरच सुरूवात  करण्यात येणार असून, या जागेवर एक ४८ मजली तर दुसरी ३० मजली सुसज्ज अशी गगनचुंबी इमारत उभी राहणार आहे. यामध्ये ७ मजले वाहनतळासाठी ( पार्किंगसाठी ) राखीव ठेवण्यात येणार आहे.

नवीन मनोरा  आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्याचे काम येत्या जुलैच्या पहिल्या आठवड्यापासुन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्यासाठी संबंधित आमदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २५६ कक्षापैकी ५६ कक्ष रिकामे करून देण्यात आले आहेत. उर्वरित कक्ष या पंधरा दिवसात रिकामे करून लगेच पाडकामाला सुरूवात करण्यात येईल.मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कापोर्रेशन (एनबीसीसी) करणार आहे. प्रस्तावित मनोरा आमदार निवासस्थानाचे रेखाचित्र जारी करण्यात आले असून, नवे मनोरा आमदार निवास हे गगनचुंबी ठरणार आहे. नव्या मनोरा आमदार निवासात एक इमारत ४८ तर दुसरी इमारत ३० मजली असणार आहे. आमदारांची आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता वाहनांच्या पार्किंगसाठी ७ मजले राखीव ठेवण्यात आले आहेत.या निवासस्थानात प्रत्येक आमदाराला सुमारे १ हजार चौ. फूटाचा कक्ष उपलब्ध करून देण्यात येईल.

.

Previous articleविजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे अभिनंदन
Next articleलोकांना खायला अन्न नाही, आणि मोदी म्हणातात योग कराः खा. अशोक चव्हाण