विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला निवडणूक

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला निवडणूक

मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.केंद्रिय निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.

काॅग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे,  शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, सुनिल तटकरे, अमरसिंह पंडीत, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर,भाजपचे विजय गिरकर यांची मुदत येत्या २७ जुलैला संपत आहे.या रिक्त होणा-या ११ जागांसाठी येत्या १६ जुलैला निवडणूक होत आहे.

केंद्रिय निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.त्यानुसार येत्या २८ जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.५ जुलै उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून,६ जुलैला छाननी करण्यात येईल.९ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.तर १६ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२० मध्ये पूर्ण होणार
Next articleबुलढाण्याची घटना महाराष्ट्राला कलंकीत करणारीः खा. अशोक चव्हाण