काकांना पुतण्याची भीती वाटू लागली आहे का ? : रामदास कदम

काकांना पुतण्याची भीती वाटू लागली आहे का ?: रामदास कदम

मुंबई : प्लॅस्टिक बंदीबाबत न्यायालयाने तीन महिन्यांची अधिकची मुदत दिल्यानंतर प्लॅस्टिक बंदीबाबत जाहीरातीद्वारे प्रबोधन करण्यात आले होते.प्लॅस्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेण्यात आला नाही.त्यामुळे याची कल्पना नसेल तर तो त्यांचा दोष आहे असा टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसेला लगावला.

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घ्यायला लावल्याने मनसे याला विरोध केला आहे. काकांना पुतण्याची भीती वाटू लागली आहे का चिमटाही कदम यांनी काढला. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच घेण्यात आला होता.तो नोटाबंदीप्रमाणे एका रात्रीत घेतलेला नाही. न्यायालयाने तीन महिन्यांची अधिकची मुदत दिली होती. त्या दरम्यान प्लॅस्टिक बंदीबाबत जाहिरातीद्वारे तसेच विविध माध्यमातुन प्रबोधन करण्यात आले.प्लॅस्टिकचा वापर करणा-यांना याआधी २०९ ते ३०० रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती.परंतु त्याचा योग्य तो परिणाम होत नसल्याने अधिकच्या दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

Previous article१ हजार १० रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे
Next articleपंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्याला शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसह मिळाले राष्ट्रीय स्तरावरचे चार पुरस्कार