महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन

*मुडे साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचा केला संकल्प

गड परिसरात लवकरच बांधणार सुसज्ज विश्रामगृह ; टोकवाडी – नागापूर रस्ता होणार राज्य मार्ग

परळी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सकाळी सपत्निक गोपीनाथ गडावर जावून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. जिल्हयाच्या पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्या साथीने मुंडे साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, गोपीनाथ गड परिसरात शासकीय जागेवर लवकरच सुसज्ज विश्रामगृह बांधणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तीन जून रोजी झालेल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कांही अडचणींमुळे उपस्थित राहता आले नव्हते, त्यामुळे आज मुद्दामहून ते समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर आले होते. काल संध्याकाळी त्यांचे परळी येथे यशःश्री निवासस्थानी आगमन झाले, खा. डाॅ.प्रितम मुंडे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

आज सकाळी चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील यांनी गोपीनाथ गडावर जावून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गड परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने खा. डाॅ प्रितम मुंडे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. गड परिसराची पाहणी करून त्यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. गड परिसर चांगल्या प्रकारे विकसित केल्याबद्दल त्यांची  पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. मुंडे साहेब भाजपचे एक प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्याकडून आम्ही खूप कांही शिकलो. तळागाळातील माणसांसाठी त्यांनी केलेले काम पुढे नेण्यासाठी तसेच त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या साथीने आम्ही कटीबध्द आहोत असे ते यावेळी म्हणाले.

रस्ते, विश्रामगृहासह परळीचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे दिले आदेश

परळी शहर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक तीर्थक्षेत्र आहे, शिवाय मुंडे साहेबांचे स्मारक येथे आहे. चांगले विश्रामगृह नसल्याने पर्यटकांची गैरसोय याठिकाणी होते. पंकजा मुंडे यांनी ही बाब आपल्याला सांगितली आहे, त्यामुळे सध्या डोंगरावर असलेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, शिवाजी चौकात असलेले विश्रामगृह पाडून त्या जागेवर नवीन विश्रामगृह व गोपीनाथ गड परिसरातील शासकीय जागेवर विश्रामगृहाची उभारणी आदी बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले. टोकवाडी ते नागापूर ह्या १६ किमी लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्गाचे रूपांतर राज्य मार्गात केले जाईल तसेच नागापूर ते लिंबुटा मार्गे वैद्यनाथ कारखान्याकडे जाणारा रस्ताही पूर्ण करू असे सांगून परळीचे जे काही प्रश्न असतील ते पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून सोडवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भाजपचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, नामदेवराव आघाव, बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ. शालिनी कराड, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, युवा नेते रामेश्वर मुंडे, प्रा. बिभीषण फड, भीमराव मुंडे, नितीन ढाकणे, रवी कांदे, अॅड. राजेश्वर देशमुख, ज्ञानदेव तांदळे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleपंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्याला शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसह मिळाले राष्ट्रीय स्तरावरचे चार पुरस्कार
Next articleविधानपरिषदेच्या चार जागांसाठी भरघोस मतदान