विलास पोतनीस कपिल पाटलांच्या विजयाची औपचारिकता बाकी

विलास पोतनीस कपिल पाटलांच्या विजयाची औपचारिकता बाकी

मुंबई:  मुंबई पदवीधर मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांच्या तर तर मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभारतीचे कपिल पाटील  यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेना आणि भाजपात चुरस आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या पहिल्या फेरीतील २८ हजार मतांची मोजणी झाली असून, भाजपाचे निरंजन डावखरे यांना १० हजार ३०४, तर शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना ९ हजार ४९४, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांना ६ हजार ५०० मते मिळाली आहेत.विधानपरिषदच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभरातीचे कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी होतील. एकूण ८ हजार ३५३ पैकी  ४ हजार ५०० पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. मात्र अजून विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७ हजार २३७ एवढे मतदान झाले होते. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत २० हजार मतांपैकी ११ हजार मते विलास पोतनीस यांना मिळाली आहेत. रात्री उशीरापर्यंत अंतिम निकाल हाती येवू शकतात.

 

Previous article“विको” ठरला महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅण्ड
Next articleउद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी न चढण्याचा आदेश द्यावा