कोकण पदवीधरमधून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी

कोकण पदवीधरमधून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी

मुंबई : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोकण पदवीधर विधानपरिषद मतदार संघात भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे संजय मोरे यांचा पराभव केला.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे विजयी झाले. डावखरे यांना २१ हजार ५२८मते मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांचा पराभव केला. संजय मोरे यांना १८ हजार ४५९ तर राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना १० हजार ३८१ मते मिळाली.

Previous articleमुंबई पदवीधरमधून शिवसेनेचे विलास पोतनीस विजयी
Next articleलोकभारतीचे कपिल पाटील यांची “हॅट्रिक”