लोकभारतीचे कपिल पाटील यांची “हॅट्रिक”
मुंबई : मुंबई शिक्षक मतदार संघातुन लोकभारतीचे कपिल पाटील हे तिस-यांदा विधानपरिषदेवर विजयी झाले असून, त्यांनी या मतदार संघातुन हॅट्रिक केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात होती.परंतु भाजपाचा उमेदवार तिस-या क्रमांकावर गेल्याने भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार अनिल देशमुख यांना उतरवून विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले होते.मात्र आज झालेल्या मतमोजणीत लोकभारतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्रिक साध्य करीत भाजपाला धक्का दिला आहे.भाजपाचे उमेदवार अनिल देशमुख हे तिस-या क्रमांकावर फेकले केले.लोकभारतीचे कपिल पाटील यांना ४ हजार ५० तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजी शेंडगे यांना १ हजार ३६ तर भाजपाचे उमेदवार अनिल देशमुख यांना १ हजार १२४ मते मिळाली.