मराठा आरक्षण लागू होवू नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका : नवाब मलिक

मराठा आरक्षण लागू होवू नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका : नवाब मलिक

मुंबई  : ज्यावेळी मराठा आरक्षण लागू करण्यात आले तेव्हा ते न्यायालयात टिकणार नाही असे मुख्यमंत्री सांगत होते. आणि आता न्यायालयाचे न्यायाधीश मराठा आरक्षणाचे काय झाले आरक्षणाचा अहवाल कधी सादर करणार अशी विचारणा करत आहे. याचाच अर्थ टाळाटाळ करण्याची भूमिका या सरकारने घेतली असून, राज्यात मराठा आरक्षण लागू होवू नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला.

मराठा आरक्षणावरुन न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी जोरदार हल्ला केला.आज ते माध्यमांशी बोलत होते.समाजकल्याण मंत्रालयाच्या मागासवर्गीय विभागाकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. या विभागाने भाजपाच्या सारथी नावाच्या संस्थेकडे अहवाल तयार करण्यासाठी दिला आहे. त्यांना आदेश देवून अहवाल तयार होत नसल्याने राज्यात मराठा, मुस्लिम आरक्षण लागू होवू नये यासाठी टाळाटाळ करण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे.आता न्यायालयाने भूमिका घेतल्यानंतर नाईलाजाने सरकारला अहवाल सादर करावा लागणार आहे असेही मलिक म्हणाले.

Previous articleयु.वाय. एव्हिएशनचे संचालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा
Next articleदक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा