युती झाल्यास काँग्रेस-राष्‍ट्रवादी औषधालाही उरणार नाही

युती झाल्यास काँग्रेस-राष्‍ट्रवादी औषधालाही उरणार नाही

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई :  नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा पोटनिवडणूका,विधानपरिषद निवडणुका आणि परवाच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूका या भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढले तरी या निवडणूकीत दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले.दोन्ही पक्षांना मिळालेली मते एकत्रित केली तर विरोधी पक्षांच्या मतांपेक्षाही जास्‍त आहेत.त्‍यामुळे आगामी निवडणूका शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढले तर  काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस औषधालाही उरणार नाही.शिवसेनेने आगामी निवडणूका या युती करून लढवाव्यात हा भाजपाचा प्रयत्न राहिल परंतु शिवसेनेला वेगळे लढायचे असल्यास स्वबळावर लढण्यास भाजपाही तयार आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री यांनी चंद्रकांत पाटील आज केले.

मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. आगामी निवडणूका शिवसेनेने भाजपासोबत युती करून लढविण्यासाठी भाजपा प्रयत्‍न करीत असल्‍याचे चंद्रकांत पाटील म्‍हणाले, गेल्या काही महिन्यात झालेल्या विविध निवडणूकीत भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढले. या निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. लोकसभा पोटनिवडणूकीत भंडा-यांचा अपवाद वगळता सर्वच निवडणूकीत शिवसेना भाजपाला चांगले यश मिळाले, शिवाय या निवडणूकांमध्ये शिवसेना भाजपाला मिळालेली मते एकत्रित केली तर विरोधी पक्षांच्या मतांपेक्षाही जास्‍त आहेत. स्वबळावर लढूनही दोन्ही पक्षांचे कसलेही नुकसान झाले नाही.त्यामुळे आगामी निवडणूकीत आमची युती झाल्यास काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस औषधालाही उरणार नाहीत. एकत्रित लढावे असा भाजपाचा प्रयत्‍न आहे. परंतु  शिवसेनेने वेगळे लढायची भूमिका घेतली तर भाजपाही स्‍वतंत्र लढायला तयार असल्‍याचेही पाटील म्‍हणाले.

नाणार प्रकल्‍पावर बोलताना महसूलमंत्री पाटील म्हणाले की, महाराष्‍ट्राच्या दृष्‍टीने हा महत्‍वाचा प्रकल्‍प आहे असून हिताचा आहे. विरोध होत असला तरी याविषयी चर्चेतून मार्ग काढला जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढाकार घेतील आणि चर्चेतून मार्ग काढतील. हा प्रकल्प रेटला जावा ही इच्छा केंद्र आणि राज्य सरकारची नाही. प्रकल्प म्हटला की जमीनी जातातच.कोयना प्रकल्प असो किंवा  मुंबई-पुणे महामार्ग प्रकल्‍प असो यासाठी जमिनी घेतलेल्या आहेत.

Previous articleदक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा
Next articleधुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे