विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार ?

विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार ?

नागपूर : उद्या पासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठकीला सुरूवात झाली असून,सरकारला विविध प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देत अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला कोणकोणत्या प्रश्नावर कोंडीत पकडता येवू शकते तसेच या अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठकीला सुरूवात झाली असून, या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे, शेकापचे भाई जयंत पाटील, हेमंत टकले , जोगेंद्र कवाडे, विजय वड्डेटीवार, आदी नेते उपस्थित आहेत.

विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे शासकीय निवासस्थानी दुपारी ३ वाजता विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, यामध्ये अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल.

Previous articleकेंद्राचे मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष –धनंजय मुंडे
Next articleनागपूर आमदार निवासात पीएचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन