..आणि विधानभवनात अवतरले…संभाजी भिडे 

..आणि विधानभवनात अवतरले…संभाजी भिडे

नागपूर :  संभाजी भिडे गुरूजी यांच्या अटकेच्या मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी भिडे यांच्या प्रमाणे वेशभूषा करीत विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून अनोखे आंदोलन केले. आ. गजभिये यांनी यावेळी भाजप-सेनेचे मंत्री आणि आमदारांना हे आंबे देण्याचा प्रयत्न केला.

संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी आजपासून येथे सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य प्रकाश गजभिये यांनी  भिडे यांच्या सारखा वेश परिधान करीत विधानभवनात प्रवेश केला. त्यांच्या या अनोख्या वेशामुळे सर्वांचे लक्ष वेधले जात होते. आणि त्यानंतर त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून भिडे यांचे आंबे विकण्याचे आंदोलन केले.आ. गजभिये यांनी यावेळी विधानभवनात प्रवेश करणा-या भाजप शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना हे आंबे देण्याचा प्रयत्न केला.आ. गजभिये यांच्या आंदोलनात आमदार विद्या चव्हाण,  आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील सहभागी झाले होते.

Previous articleराष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
Next articleमहाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये भाजपाची दमदार एन्ट्री