विकोगर्ल मिष्टी चक्रवर्ती संजीव पेंढरकरांच्या हस्ते सन्मानित

विकोगर्ल मिष्टी चक्रवर्ती संजीव पेंढरकरांच्या हस्ते सन्मानित

मुंबई : विको टर्मरिक क्रीम इन फोम बेस या उत्पादनाला तसेच या उत्पादनाच्या जाहिरातीला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सध्या विकोगर्ल म्हणून ओळखली जाणारी मिष्टी चक्रवर्ती हिला विको लेबॅारेटरीचे संचालक संजीव पेंढरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

विको टर्मरीक क्रीम इन फोम बेस व विको टर्मरीक क्रीम यांच्या वापरामुळे त्याचे प्रत्यक्षात मिळणारे फायदे जसेच्या तसे जाहिरातीतून सांगण्यात आले आहेत.अवलोकनाती असेही दिसून आले की, या क्रीमच्या नियमित वापराने त्वचा चमकदार तर दिसू लागतेच पण त्वचेवरील विविध प्रकारचे मुरूम, फोड आणि अॅकनेसारख्या विकारांना आळाही बसतो. विकोचे संचालक संजीव पेंढरकर यांना नुकत्याच झालेल्या एका शानदार सोहळ्यात क्वालिटी ब्रॅण्ड बिझनेस एक्सलेन्स पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अनेक ख्यातनाम व्यक्ती उपस्थित होते. बॅालीवूड मध्ये कांची या चित्रपटापासून खरी नविन ओळख लाभलेली आणि त्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली मिष्टी चक्रवर्ती, सध्या विकोच्या जाहिरातीमुळे विकोगर्ल म्हणून ओळखली जात आहे. संजीव पेंढरकर यांच्या हस्ते करण्यात आलेल्या या सत्काराला सकारात्मकतेने प्रतिसाद प्रतिसाद देऊन व त्याचा स्वीकार करून मिष्टी यांनी विको जाहिरातीमध्ये काम केल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला आणि यापुढेही विकोच्या नविन उत्पादनाची जाहिरात करण्याकरीता आनंदाने सहमती दर्शवली.अभिनेत्री मिष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व अतिशय प्रतिष्ठीत विको ब्रॅण्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल तिने संजीव पेंढरकर व विको लेबॅारेटरीजचे अभिनंदन केले,जो महाराष्ट्रातील एक उच्चतम पुरस्कार म्हणून गणला जातो आणि सुप्रसिद्ध अर्थसंकेत या संस्थेद्वारे दिला जातो.

Previous articleआ. प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर ठोकला ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
Next articleकेंद्राचा हमीभाव वाढ निर्णय म्हणजे चुनावी जुमला–धनंजय मुंडे