भाजपाच्या सहाव्या उमेदवारामुळे विधानपरिषेच्या निवडणूकीत रंगत

भाजपाच्या सहाव्या उमेदवारामुळे विधानपरिषेच्या निवडणूकीत रंगत

नागपूर : येत्या १६ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणा-या निवडणूकीसाठी आज भाजपाचे पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीतील रंगत वाढली आहे.

येत्या १६ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाकडून पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाच्या सहाव्या उमेदवारामुळे निवडणूकीची रंगत वाढली आहे. आज भाजपाकडून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर,रमेश पाटील आणि निलय नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.

शिवसेनेचे उमेदवार अॅड. अनिल परब आणि मनिषा कायंदे यांच्यासह, शेकापचे जयंत पाटील,काॅग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. उद्या ६ जुलैला अर्जांची छाननी करण्यात येईल.९ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा १६ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल.

Previous articleमी काचेच्या घरात नव्हे; दगडी वाड्यात राहतो :विखे पाटील
Next articleराज्यातील ३०२ ग्रामपंचायतींना मिळणार नवीन दुमजली इमारत :पंकजा मुंडे