पावसाच्या  झुळकीने कामकाज बंद करावे लागणे हे सरकारचं अपयश : जयंत पाटील

पावसाच्या  झुळकीने कामकाज बंद करावे लागणे हे सरकारचं अपयश : जयंत पाटील

नागपूर : पावसाच्या एका साध्या झुळकीने अधिवेशन स्थगित करावं लागणं याचा अर्थ राज्य सरकार किती निर्ढावलेले आहे हे दिसते. नागपूर येथे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला असताना या ठिकाणी साधी व्यवस्थाही सरकारला करता आलेल्या नाहीत हे सरकारचे अपयश आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वीजपुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवावे लागले.विधीमंडळाच्या इतिहासामध्ये अशी घटना पहिल्यांदा घडली असून, त्यावर जयंत पाटील यांनी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. सरकारने जो दुरदर्शीपणा दाखवायला हवा होता तो दाखवला नाही. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली नाही. आमदार निवासही पाण्याने वेढलेले होते. विधानसभेच्या सर्व इमारतीच्या आसपास पाण्याने वेढा दिला होता. पाणी इतके वाढले की वीजेचा पुरवठा करणाऱ्या सब स्टेशनजवळ पाणी साचले आणि त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला. पहिल्यांदा २५-३० वर्षात मी बघतोय असे घडतंय की साध्या पावसाच्या पाण्यामुळे राज्याच्या विधीमंडळाचे दोन्ही सभागृह स्थगित करावी लागली.

राज्य सरकारने पूर्ण जबाबदारीने नागपूरचे अधिवेशन पावसाळ्यात घ्यायचा निर्णय घेतला. आम्ही त्याला साथ दिली. गेले तीन दिवस आम्ही इथे आलो आहोत. पावसाळी जी खबरदारी घेवून आवश्यक त्या सुविधा ठेवणं आवश्यक होतं. मात्र यामध्ये राज्य सरकार फेल झाले आहे. विधीमंडळाची व्यवस्था करणारी जी लोक आहेत त्यांनाही पूर्णपणे अपयश आलेले आहे असेही पाटील म्हणाले.

Previous articleराज्य सरकारने अक्षरश: लोकशाहीचे धिंडवडे काढलेय : अजित पवार
Next articleसाडे तीन वर्षाचं सरकारचं नियोजन फसलं तसंच पावसाळी अधिवेशन घेवून फसलं : धनंजय मुंडे