विधानपरिषदेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष; सभापतीपदावर दावा करणार ?

विधानपरिषदेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष; सभापतीपदावर दावा करणार ?

नागपूर : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाल्याने विधानपरिषदेत भाजपा शिवसेना युती बहुमतामध्ये आली असून, २१ या संख्याबळानुसार भाजपा वरच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने आगामी अधिवेशनात भाजपा सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला उपसभापतीपद मिळू शकते.

यापूर्वी विधानपरिषदेत संख्याबळानुसार सर्वात मोठा पक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी काॅग्रेसचे संख्याबळ घटले असून, ते १७ वर आले आहे. तर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने भाजपाचे संख्याबळ २१ वर जाऊन भाजपा वरच्या सभागृहातील संख्याबळाने मोठा पक्ष ठरला आहे.आज झालेल्या बिनविरोध निवडणूकीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.सध्या भाजप-२१, राष्ट्रवादी काॅग्रेस-१७, काॅग्रेस-१७,शिवसेना-१२,लोकभारती-१ , पीआरपी ( जोगेंद्र कवाडे )-१,राष्ट्रीय समाज पक्ष-१,शेकाप-१,अपक्ष-६, असे संख्याबळ आहे. १ जागा रिक्त ( पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त)

भाजपा २१, शिवसेना १२, अपक्षातील तीन सदस्य हे शिवसेना तर दोन  भाजपा समर्थक सदस्य आहेत.तर विरोधकांमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस-१७, काॅग्रेस-१७,लोकभारती-१,शेकाप-१, पीआरपी-१,अपक्ष-१ असे संख्याबळ आहे. या संख्याबळाच्या जोरावर आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधा-यांकडून सभापती आणि उपसभापतीपदावर दावा केला जावू शकतो.त्यानुसार भाजला सभापतीपद तर शिवसेना उपसभापतीपद मिळू शकते.

Previous articleहे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? :धनंजय मुंडें
Next articleदोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती करणार: शिक्षण मंत्री