ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान

ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान

आमदार प्रकाश गजभिये

नागपूर : ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान असा फलक हातात घेत संत तुकाराम महाराजांचा पेहराव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना अटक करण्याची मागणी केली.

संभाजी भिडे यांच्या मनुवादी विचारांचा निषेध म्हणून आमदार प्रकाश गजभिये यांनी संत तुकारामांचा पेहराव करुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडे यांचा पेहराव करत त्यांच्या शेतातील आंबे भाजप मंत्री आणि आमदारांना देत आंदोलन करत लक्ष वेधले होते आणि आज संताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आ. गजभिये चक्क संत तुकारामांच्या पेहरावात विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले.

Previous articleअद्याप केंद्राची मदत का नाही?: विखे पाटील
Next articleनाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री