फडणवीस सरकार अल्पमतात !

फडणवीस सरकार अल्पमतात !

पृथ्वीराज चव्हाण

नागपूर : विधानसभेत फडणवीस सरकार अल्पमतात आले असून, नाणार प्रकल्पावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत. आता तरी सरकारने नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.

विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी मागणी काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस आणि शिवसेना या पक्षांची आहे. केंद्र सरकारने राज्य व राज्य सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचेही संमती न घेता हा प्रकल्प लादला आहे. नाणारबाबत सभागृहात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत सापडले आहे, असे चव्हाण म्हणाले.

Previous articleदुस-या दिवशीही “नाणार जाणार” 
Next articleभगवत गीतेच्या संचाचे वाटप शासनामार्फत नाही: तावडे