खड्डयांमुळे झालेले मृत्यू हे महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच

खड्डयांमुळे झालेले मृत्यू हे महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच

धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल

नागपूर : कल्याण मध्ये खड्यामुळे झालेले पाच मृत्यू असो की, चंद्रपूर मध्ये झालेले मृत्यू, रस्त्यावरील खड्यांमुळे झालेले मृत्यू हे अपघात नसून शहराची महापालिका आणि राज्य शासनाने मिळुन केलेले हे खूनच आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.

विधानपरिषदेत नियम २८९ अन्वये राज्यातील खड्यांमुळे होत असलेल्या मुद्दावर बोलतांना धनंजय मुंडे यांनी राज्यातील रस्त्यांवर खड्यांमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाहता महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे, ही गंभीर बाब आहे. हे मृत्यु म्हणजे खून असुन रस्त्यांच्या कंत्राटातील टक्केवारी आणि माणसांच्या जीवाबाबतची बेफिकरी जबाबदार असल्याचा आरोप केला. कल्याणच्या ज्या चौकात आरोह आतराळे याचा खड्यामुळे मृत्यू झाला तो खड्डा बुजवावा म्हणुन महापालिकेला त्याच्या वडिलांनी पत्र देऊनही कारवाई झाली नाही, त्यातच मनिषा भोईर यांचा बळी गेला. लोकांच्या जीवाबद्दल प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा मग्रुरी आणि अमानुषपणा असल्याने या दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्यांमुळे होणारे मृत्यूवरून केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला.

राज्यात गुटखा बंदी असली तरी चोरट्या व छुप्या मार्गाने गुटख्याची वाहतुक व विक्री सुरूच असल्याची कबुली अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

याबाबत धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करून गुटखा बंदी असली तरी परराज्यातून गुटख्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्यात गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी करून भ्रष्ट साखळी शोधून काढावी, अशी मागणी केली होती. त्यावर मंत्री बापट यांनी दिलेल्या उत्तरात सन २०१७-१८ या वर्षात ३९ कोटी ८४ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleअन्यथा इंटीग्रेटेड कॉलेजची मान्यता रद्द करणार : शिक्षणमंत्र्यांचा इशारा 
Next articleउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव