दरोड्याच्या प्रश्नावरून गृहराज्यमंत्री आणि नितेश राणेंमध्ये चकमक

दरोड्याच्या प्रश्नावरून गृहराज्यमंत्री आणि नितेश राणेंमध्ये चकमक

नागपूर : सिंधुदुर्गातील निरूखे येथिल माजी सरपंच रामदास करंदीकर यांच्या घरावर पडलेल्या दरोडा संदर्भात आज विधानसभेत कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राणे आणि गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यात चकमक उडाली.

निरूखेचे माजी सरपंच रामदास करंदीकर यांच्या घरावर पडलेल्या दरोडा संदर्भात आज विधानसभेत कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून संबंधित अधिका-यांवर कारवाईची मागणी केली.तर अॅडीशनल एसपींचा यामध्ये कसलाही संबंध अडळून आला नसून, कथित दरोडा टाकणा-यांना अटक करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी देवून या तपासात कमतरता असल्यास सीआयडी चौकशी करू असे या प्रश्नावर उत्तर दिले.

या उत्तरानंतर आ. नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री केसरकरांवर निशाणा साधला.सिंधुदुर्ग जिल्हा हा गृहराज्यमंत्र्यांचा आहे.कायदा सुव्यव्यस्था राखण्यात त्यांचा धाक राहिला नाही असा टोला त्यांनी लगावला असता, गृहराज्यमंत्री हे चांगले काम करीत असून, त्यांचे काम ठिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच गृहराज्यमंत्री केसरकर यांनी संधी साधत जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था उत्कृष्ट आहे. जिल्ह्यातील क्राईम सर्वात कमी आहे.पूर्वीच्या काळी कायदा सुव्यवस्था ढासळली होती. दिवसा ढवळ्या अनेक खून झाले आहेत.मात्र आता गुन्हेगारांवर धाक आहे असा पलटवार गृहराज्यमंत्र्यांनी केला.

Previous articleकाल रात्री सव्वा बाराला कामकाज संपले आणि सुरू झाले ठिय्या आंदोलन 
Next articleसरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का ?- धनंजय मुंडे