मलकापूर नगरपरिषद, चंदगड व गारगोटी नगरपंचायत प्रस्तावाबाबत चार आठवड्यात निर्णय

मलकापूर नगरपरिषद, चंदगड व गारगोटी नगरपंचायत प्रस्तावाबाबत चार आठवड्यात निर्णय

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

नागपूर : सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायतीस नगरपरिषदेचा दर्जा, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व गारगोटी ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार आठवड्यात घेतला जाणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य आनंदराव पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. डॉ. पाटील म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायतींचे नगरपंचायत, नगरपरिषदेत रुपांतर करुन नागरी दर्जा देण्याची कार्यवाही महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३, कलम ३४१ (अ) (२) व कलम ३४१ (अ)(१अ) मधील अटींची पूर्तता होत असल्यास शासनाकडून करण्यात येते. तर नगरपंचायतींचे नगरपरिषदेत रुपांतर करण्याची कार्यवाही कलम ३४१ (ड) मधील तरतुदीनुसार शासनाकडून केली जाते. याबाबत  तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायती व ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे त्यांना नगरपंचायत, नगरपरिषदेत रुपांतर करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी यासंदर्भात झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

Previous articleशिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत वादंग
Next articleपंकजा मुंडे यांच्या कामाची केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी केली प्रशंसा