“सब प्रभू की लिला है” : मुख्यमंत्री

“सब प्रभू की लिला है” : मुख्यमंत्री

नागपूर : विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत आज युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे कामकाज बघत होते तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू हे वारंवार मंत्र्यांना प्रश्न विचारत होते. हाच धागा पकडत
अजित पवार प्रभूंचे नाव न घेता चिमटा काढला असता ‘सब प्रभू की लिला है’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना दाद दिली आणि सभागृहात एकच हशा पिकल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार किती मुत्सद्दी राजकारणी आहेत हे वेगळे सांगणे काही गरजेचे नाही. अजित पवार विरोधकांना चिमटे काढण्याची संधी कधीच सोडत नसतात. सभागृहात फ्रि हिट मिळाली तर त्यावर सिक्सर मारणार नाहीत ते अजित पवार कसले.

आज विधानसभेत शिवसेनेला किंबहुना सभागृहालाच अजित पवार यांचा सिक्सर पाहायला मिळाला.सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज विधानभवनात आले होते.

विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसून आदित्य ठाकरे कामकाज बघत होते तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू हे वारंवार मंत्र्यांना प्रश्न विचारत होते. अर्थात हा सुनील प्रभू यांचा हक्क आहेच मात्र अजित पवार यांनी हाच धागा पकडत सुनील प्रभू यांना नाव न घेता टोला लगावला. अजित पवार म्हणाले की आज युवा नेतृत्व आल्यामुळे प्रश्नांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर ‘सब प्रभू की लिला है’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना दाद दिली आणि सभागृहात हशा पिकल्या.

Previous articleपंकजा मुंडे यांच्या कामाची केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी केली प्रशंसा
Next articleदूध आंदोलकांवर दरोडेखोरांचे कलम लागणार नाही!