वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ करा – आ. प्रवीण दरेकर
नागपूर : राज्यभरातील वृत्तपत्र विक्रत्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यांचा असंघटित कामगार म्हणून समाविष्ट न करता, त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत केली.
वृत्तपत्र विक्रेते स्टॉलधारक उन्हात, पावसात वृत्तपत्रे घरोघरी टाकण्याचे काम करतात. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यांची प्रमुख मागणी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची आहे. त्यांसंदर्भात अनेक बैठकी झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने त्यांचा असंघटित कामगारांच्या यादीमध्ये समावेश न करता स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
त्यावर उत्तर देताना कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी सांगितले कि, या विषयावर अनेक बैठका झालेल्या आहेत. तेव्हा वृत्तपत्र विक्रेते हे असंघटित कामगार मधीलच एक स्वतंत्र घटक एक स्वतंत्र सल्लागार समिती गठित करू, असे आश्वसन त्यांनी दिले.