“नफरत से नहीं, प्यार से जीतेंगे” काॅग्रेसची पोस्टरबाजी
मुंबई : मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावा नंतर मुंबई काँग्रेसने आज पोस्टरबाजी केली आहे.नफरत से नहीं, प्यार से जीतेंगे…अशा आशयाचे राहुल-मोदींच्या गळाभेटीचा फोटो या पोस्टरवर लावण्यात आले आहेत.
मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर याचा पोस्टरद्वारे काॅग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. आज मुंबईतील विविध भागात राहुल-मोदींच्या गळाभेटीचा फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत.नफरत से नहीं, प्यार से जीतेंगे…असे यावर लिहिण्यात आले आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही पोस्टरबाजी करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.