मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मंत्री पदाचा राजीनामा : सुभाष देशमुख
पंढरपुर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू असून, आज पंढरपुरला जात असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि येत्या आषाढी एकादशी पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्या मंत्रीपदाचा राजीनामा देवू असे आश्वासन दिले.
आज पंढरपूरला जाताना माचणूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मराठा आरक्षण आंदोलकांची भेट घेतली, सरकारच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात करत असलेल्या कार्यवाहीबाबत यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना माहिती दिली, या वेळी आंदोलकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी फोनद्वारे बोलणे करून देण्यात आले.
सर्व मराठा समाजाच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.